मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त मुलाखत दिली आहे. ही मुलाखत खासदार संजय राऊत आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी घेतली असून ती ८ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.
या मुलाखतीतील पहिला फोटो समोर आला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि महेश मांजरेकर एकत्र बसलेले दिसत आहेत.
या मुलाखतीत ठाकरे बंधू नेमकं काय बोलणार, याकडे राजकीय वर्तुळासह सर्वांचे लक्ष लागले आहे.


