मुंबई महापालिका निवडणुक :  राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून तरुणांना संधी देण्याचा निर्धार

0
120

मुंबई

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल मुंबईतील प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी प्रत्येक इच्छुक उमेदवाराशी वैयक्तिक चर्चा करून प्रभागनिहाय सामाजिक व राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच उमेदवारांना पुढील वाटचालीसाठी आवश्यक ते मार्गदर्शनही करण्यात आले.

मुंबई महापालिका निवडणुक :  राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून तरुणांना संधी देण्याचा निर्धार
मुंबई महापालिका निवडणुक :  राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून तरुणांना संधी देण्याचा निर्धार

या प्रसंगी पक्षाने जनसामान्यात प्रभाव व स्वीकारार्हता असलेल्या उमेदवारांनाच उमेदवारी देण्याची आपली परंपरा कायम ठेवणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने तरुणांना संधी देण्याचा निर्णय घेतला असून, नव्या नेतृत्वाला बळ देण्यात येणार असल्याचा विश्वास उपस्थितांना देण्यात आला. येणाऱ्या सर्व निवडणुका एकीच्या बळावर आणि ताकदीने लढण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

या महत्त्वपूर्ण बैठकीस पक्षाच्या मुंबई विभागीय अध्यक्षा राखीताई जाधव, राष्ट्रीय प्रवक्ते नसीम सिद्दीकी, प्रवक्त्या व माजी आमदार विद्याताई चव्हाण, माजी आमदार व वाहतूक विभागाचे राज्यप्रमुख मिलिंद (अण्णा) कांबळे, माजी महापौर निर्मलाताई सामंत–प्रभावळकर, प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार व बबन कनावजे, पक्षाचे माजी मुंबई अध्यक्ष चंद्रकांत त्रिपाठी, मुंबईतील सर्व जिल्हाध्यक्ष, मुंबई प्रशासन प्रमुख तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here