मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकास अभिवादन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकास अभिवादन
चौंडी (जामखेड), दि. ३१ मे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी (ता. जामखेड) येथे असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकास भेट देऊन अभिवादन केले.
यावेळी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनीही स्मारकास अभिवादन करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यास आदरांजली अर्पण केली.
कार्यक्रमास विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या दूरदर्शी नेतृत्व, न्यायप्रिय कारभार आणि लोककल्याणकारी कार्यातून भारतीय इतिहासात अजरामर स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना अभिवादन केले.