मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून नवनियुक्त मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांचे अभिनंदन

0
102

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे त्यांची भेट घेऊन त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आणि भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांचे निधन; समाजवादी चळवळीला मोठी पोकळी

राज्य शासनाच्या सर्वोच्च प्रशासकीय पदाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या अग्रवाल यांच्याकडून प्रभावी प्रशासन, विकास प्रकल्पांना गती आणि लोकाभिमुख कारभाराची अपेक्षा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले. राजेश अग्रवाल यांनीही राज्य प्रशासन अधिक सक्षम, पारदर्शक आणि जनहितैषी करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

या भेटीदरम्यान राज्यातील आगामी प्रशासकीय प्राधान्यक्रमांसंदर्भात अनौपचारिक चर्चा झाली. नवीन मुख्य सचिवांच्या कार्यकाळात राज्य प्रशासन अधिक गतिमान होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here