मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेला गती; ऑनलाइन पोर्टल पूर्ण होईपर्यंत ऑफलाइन प्रस्ताव स्वीकारण्याचे निर्देश

0
18

मुंबई :
मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना राज्यात प्रभावी आणि वेगाने राबविण्यासाठी ऑनलाइन पोर्टलची सद्यस्थिती तसेच त्यातील प्रक्रियेमुळे होणाऱ्या विलंबाचा मत्स्य व्यवसाय व बंधारे मंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला. ऑनलाइन प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित होईपर्यंत आवश्यकतेनुसार ऑफलाइन पद्धतीने प्रस्ताव स्वीकारून त्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत प्राप्त झालेल्या एकूण प्रस्तावांचा आढावा घेऊन त्यानुसार प्रलंबित प्रस्तावांवर कार्यवाही करण्याच्या सूचनाही नितेश राणे यांनी दिल्या. योजनेच्या अंमलबजावणीत तांत्रिक किंवा प्रशासकीय प्रक्रियेमुळे लाभार्थ्यांना अनावश्यक विलंब होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
मत्स्य व्यवसायाशी संबंधित नागरिक, मच्छीमार आणि पात्र लाभार्थ्यांना योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळणे आवश्यक असल्याचे सांगत प्रशासनाने अधिक गतिमानतेने काम करण्याच्या सूचना राणे यांनी दिल्या. योजनेच्या अंमलबजावणीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी स्वतः प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करून प्रगतीची पाहणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ऑनलाइन प्रणाली अधिक सुलभ आणि कार्यक्षम करण्यासाठी संबंधित विभागांमध्ये समन्वय राखण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. यामुळे योजनेतील प्रस्तावांची प्रक्रिया वेगाने पूर्ण करून मच्छीमार आणि मत्स्य व्यवसायाशी संबंधित लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
बैठकीला मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव एन. रामास्वामी, मत्स्यआयुक्त भानुदास पालवे, महाआयटीच्या व्यवस्थापकीय संचालक भुवनेश्वरी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here