मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत रहाटाड ग्रामपंचायतीला भेट
रहाटाड / ता. तळा – महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत आज रहाटाड, तालुका तळा येथील ग्रामपंचायतीला भेट देण्यात आली. हा उपक्रम जिल्हा परिषद रायगड यांच्या माध्यमातून राबविण्यात येत असून, ग्रामीण भागातील विकासाची गती वाढविणे, शासनाच्या योजना प्रभावीपणे अंमलात आणणे तसेच ग्रामपंचायतींची प्रशासनिक क्षमता अधिक सक्षम बनविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

हे पण वाचा बीकेसीतील सागरी मंडळाच्या कार्यालयीन इमारतीसाठी वाढीव शुल्क रद्द
या भेटीदरम्यान पथकाने ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध विकासात्मक उपक्रमांची सविस्तर माहिती घेतली. गावातील नागरिकांच्या मूलभूत गरजा, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य, शिक्षण, डिजिटल सेवा, तसेच इतर सोयी-सुविधांचा सखोल आढावा घेण्यात आला. स्थानिक पातळीवर आवश्यक असलेल्या उपाययोजना आणि सुधारणा कोणत्या करता येतील, यावरही यावेळी चर्चा करण्यात आली.
या अभियानाच्या माध्यमातून गावोगावी शाश्वत विकास, पारदर्शक प्रशासन आणि सक्षम स्थानिक स्वराज्य व्यवस्था निर्माण करण्याची दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे आणि ग्रामपंचायतींना अधिक सक्षम बनवणे हा या अभियानाचा मुख्य हेतू असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.


