मुरबाड तहसील ई-केवायसी करणारे तालुक्यातील पहिले कार्यालय
मुरबाड : तालुक्यातील कार्यक्षम प्रशासनाच्या दिशेने मुरबाड तहसील कार्यालयाने महत्त्वाचा टप्पा गाठला असून, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणारे मुरबाड तहसील हे तालुक्यातील पहिले कार्यालय ठरले आहे. महसूल विभागाच्या निर्देशानुसार ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांनी समन्वयाने काम करत ही प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली.
ई-केवायसीमुळे शेतकरी व लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळणे सुलभ होणार असून, कामकाजात पारदर्शकता वाढणार आहे. या यशाबद्दल मुरबाड तहसीलदार, ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.


