मुलुंडमध्ये २६-२७ सप्टेंबरला ‘कोकणी बाजारपेठ’

0
20
मुलुंडमध्ये २६-२७ सप्टेंबरला ‘कोकणी बाजारपेठ’
मुलुंडमध्ये २६-२७ सप्टेंबरला ‘कोकणी बाजारपेठ’

मुलुंडमध्ये २६-२७ सप्टेंबरला ‘कोकणी बाजारपेठ’

कोकणातील उद्योजकांची विविध उत्पादने एकाच छताखाली

मुंबई :
कोकणातील उद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘मिशन कोकण साम्राज्य’च्या वतीने ‘कोकणी बाजारपेठ’ या विशेष उपक्रमाचे आयोजन २६ व २७ सप्टेंबर २०२६ रोजी मुलुंड पूर्व येथे करण्यात आले आहे. मुलुंड, ठाणे, भांडुप आणि कांजूरमार्ग परिसरातील नागरिकांसाठी ही बाजारपेठ खरेदीची विशेष पर्वणी ठरणार आहे.
या बाजारपेठेत कोकणातील उद्योजकांनी तयार केलेले विविध घरगुती पदार्थ, आकर्षक दागिने, साड्या, कपडे, हस्तकला वस्तू, गिफ्टिंग साहित्य, नैसर्गिक उत्पादने तसेच विविध उपयुक्त वस्तू एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. स्थानिक पातळीवर तयार होणाऱ्या उत्पादनांना ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी या उपक्रमाचा उपयोग होणार आहे.

‘कोकणी बाजारपेठ’ दत्तात्रेय एन. एक्स. हॉल, मुलुंड स्टेशनसमोर, शिवसेना शाखेच्या वर, मुलुंड पूर्व येथे भरविण्यात येत आहे. २६ आणि २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत नागरिकांना या बाजारपेठेला भेट देता येणार आहे.

स्थानिक तसेच कोकणातील उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांनी कुटुंबीय आणि मित्रपरिवारासह भेट देऊन कोकणातील विविध उत्पादनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक अजय यादव यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here