मोहोपे स्थानकाचे  नामांतर “पोयंजे” रेल्वे स्थानक

0
54
मोहोपे स्थानकाचे  नामांतर “पोयंजे” रेल्वे स्थानक
मोहोपे स्थानकाचे  नामांतर “पोयंजे” रेल्वे स्थानक

मोहोपे स्थानकाचे  नामांतर “पोयंजे” रेल्वे स्थानक

मुंबई | प्रतिनिधी

कर्जत–पनवेल रेल्वे मार्गावरील “मोहोपे” रेल्वे स्थानकाचे नाव बदलून “पोयंजे” रेल्वे स्थानक असे ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. या निर्णयानुसार स्थानकाचा नवीन कोड PYJE असा करण्यात आला आहे.

महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार तसेच भारताच्या सर्व्हेअर जनरल यांच्या पत्रानुसार हे नामांतर करण्यात आले आहे. नव्या नावामुळे स्थानिक भौगोलिक व ऐतिहासिक ओळख अधिक ठळकपणे अधोरेखित होणार असून रेल्वेच्या सर्व अधिकृत नोंदी, वेळापत्रके आणि तिकीट प्रणालीत “पोयंजे” हेच नाव वापरण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here