युनेस्कोमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे संविधान दिनी अनावरण

0
10
युनेस्कोमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे संविधान दिनी अनावरण
युनेस्कोमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे संविधान दिनी अनावरण

युनेस्कोमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे संविधान दिनी अनावरण

पॅरिस | युनेस्को (UNESCO) मुख्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Bharatratna Ambedkar  statue Paris)यांच्या पुतळ्याचे संविधान दिनी अत्यंत दिमाखात अनावरण करण्यात आले. महाराष्ट्र शासनाने युनेस्कोला दिलेल्या या पुतळ्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय लोकशाही, समता आणि सामाजिक न्यायाची ठाम ओळख अधिक दृढ झाली आहे.

या अनावरण सोहळ्यात युनेस्कोचे महासंचालक खालिद अल-इनाय यांच्या हस्ते पुतळ्याचे उद्‌घाटन झाले. यावेळी भारताचे युनेस्कोतील स्थायी प्रतिनिधी विशाल शर्मा तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis reaction) यांनी या ऐतिहासिक क्षणाला “सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस” असे संबोधले. त्यांनी युनेस्कोच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि या उपक्रमात योगदान देणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

फडणवीस म्हणाले,
“महामानव डॉ. आंबेडकर यांनी जगाला समता, बंधुता आणि सामाजिक परिवर्तनाची दिशा दिली. भारतीय संविधान हे त्यांच्या बुद्धिमत्ता व कर्तृत्वाचे अपूर्व उदाहरण आहे. संविधान दिनी युनेस्को मुख्यालयात त्यांच्या पुतळ्याचे अनावरण होणे हा जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही राष्ट्राला प्राप्त झालेला सर्वोच्च सन्मान आहे.”

मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हा पुतळा उभारण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे अभिनंदनही केले.
“हा क्षण महाराष्ट्रातील आणि जगभरातील सर्व भारतीयांसाठी अविस्मरणीय आहे,” असे त्यांनी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here