युवराणी अनुसयराजे पटवर्धन यांनी घेतले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन
युवराणी अनुसयराजे पटवर्धन यांनी घेतले श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन
मिरज
मिरज येथील परमपूज्य श्रीमंत सौ. अनुसयराजे माधवराजे पटवर्धन महाराज, युवराणी साहेब यांनी पुण्यातील ऐतिहासिक श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाला भेट देऊन बाप्पांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गणरायाच्या पवित्र चरणी आरती करून भक्तिभावाने पूजाअर्चा केली.
या भेटीदरम्यान युवराणी साहेबांनी पुण्यातील सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरांच्या जतन व संवर्धनासाठी कार्यरत असलेले श्री. पुनीत बालन यांचीही भेट घेतली. या भेटीला विशेष कौटुंबिक महत्त्व लाभले. युवराणी साहेबांचे आजोबा श्री. श्रीनिवास पाटील आणि बालन कुटुंबीय यांच्यात अनेक वर्षांपासून घनिष्ठ कौटुंबिक स्नेहसंबंध असल्याने पुनीत बालन यांची भेट हा जुन्या कौटुंबिक नात्यांना उजाळा देणारा आनंददायी प्रसंग ठरला.
या प्रसंगी श्रीमती रचनादेवी सारंग पाटील, श्रीमती पौर्णिमा पवार, सेलिब्रिटी शेफ सर्वेश जाधव आणि श्रीमती उत्पल सर्वेश जाधव यांचीही उपस्थिती होती. भक्ती, गणेशोत्सवाची परंपरा आणि जिव्हाळ्याचे कौटुंबिक संबंध यांचा सुंदर संगम या भेटीत पाहायला मिळाला. त्यामुळे युवराणी साहेबांची श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाला दिलेली ही भेट अविस्मरणीय ठरली.