रत्नागिरीतील महाराष्ट्र राज्य ग्रंथालय अधिवेशनाच्या तारखांमध्ये बदल

0
43
मुंबईत जिल्हा ग्रंथोत्सवाचे आयोजन; २७-२८ मार्चला दादरमध्ये पुस्तकांचा मेळा
मुंबईत जिल्हा ग्रंथोत्सवाचे आयोजन; २७-२८ मार्चला दादरमध्ये पुस्तकांचा मेळा

रत्नागिरीतील महाराष्ट्र राज्य ग्रंथालय अधिवेशनाच्या तारखांमध्ये बदल

रत्नागिरी l प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या रत्नागिरी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. राज्यात निर्माण झालेल्या निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती संघाने पत्रकाद्वारे दिली आहे.

राज्य शासनाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्यामुळे, विशेषतः कोकण विभागातील निवडणूक प्रक्रियेमुळे पूर्वनियोजित तारखांना अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे यापूर्वी १९ व २० फेब्रुवारी २०२६ रोजी होणारे अधिवेशन आता २१ व २२ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अधिवेशन रत्नागिरी येथेच होणार असून, केवळ तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. या बदलाची नोंद सर्व संबंधितांनी घ्यावी, असे आवाहन संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार व कार्यवाह सोपनराव पवार यांनी केले आहे.

या अधिवेशनासाठी राज्यभरातील ग्रंथपाल, अभ्यासक आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, ग्रंथालय चळवळीच्या दृष्टीने हे अधिवेशन महत्त्वाचे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here