रत्नागिरीत नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ‘सखी निवास’ वसतिगृह

0
24
रत्नागिरीत नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ‘सखी निवास’ वसतिगृह; प्रवेश प्रक्रिया सुरू
रत्नागिरीत नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ‘सखी निवास’ वसतिगृह; प्रवेश प्रक्रिया सुरू

रत्नागिरीत नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ‘सखी निवास’ वसतिगृह

प्रवेश प्रक्रिया सुरू

रत्नागिरी
केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागांतर्गत भारतीय कष्टकरी रयत सेवा संस्था (भाकर) संचलित ‘सखी निवास’ महिला वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. रत्नागिरी शहर तसेच आजूबाजूच्या परिसरात नोकरी करणाऱ्या महिलांसाठी सुरक्षित, सुसज्ज आणि हक्काचे निवासस्थान म्हणून हे वसतिगृह उपलब्ध करण्यात आले आहे.
‘सखी निवास’ हे वसतिगृह गणेशनगर, कुवारबाव, आरटीओ रोडजवळ, ता. जि. रत्नागिरी – ४१५६१२ येथे स्थित आहे. प्रवेशासाठी इच्छुक महिलांनी मोबाईल क्रमांक ८३७९९४७४९८ किंवा ७५०७७९५३२१ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत संपूर्ण इमारत २४ तास सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली ठेवण्यात आली असून चोवीस तास सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. वसतिगृह परिसर शांत, स्वच्छ आणि सुरक्षित वातावरणाने परिपूर्ण आहे.
याशिवाय शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अंघोळीसाठी गरम पाणी, २४ तास वीजपुरवठा, इन्व्हर्टर बॅकअप, स्वतंत्र व प्रशस्त भोजन हॉल तसेच दर्जेदार मेस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
उत्तम सुविधा आणि दर्जेदार व्यवस्था कायम राखण्यासाठी वसतिगृहाची प्रवेश क्षमता मर्यादित ठेवण्यात आली असून नोकरी करणाऱ्या महिलांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here