रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘प्रलोभनास बळी न पडता मतदान’ प्रतिज्ञा
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या सूचनेनुसार २५ जानेवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात मतदारांसाठी प्रतिज्ञा घेण्यात आली. या कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपस्थित होते.
यावेळी नायब तहसिलदार दीपक चव्हाण यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदार प्रतिज्ञा दिली. “आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू, मुक्त, निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू आणि प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू,” अशी प्रतिज्ञा यावेळी उपस्थितांनी घेतली.
या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी (रोहा) हर्षलता गेडाम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी जागरूक व जबाबदार मतदानाचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.


