रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या ग्रंथपाल मीनल हळदणकर यांना राज्यस्तरीय ग्रंथमित्र पुरस्कार जाहीर

0
10
रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या ग्रंथपाल मीनल हळदणकर यांना राज्यस्तरीय ग्रंथमित्र पुरस्कार जाहीर
रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या ग्रंथपाल मीनल हळदणकर यांना राज्यस्तरीय ग्रंथमित्र पुरस्कार जाहीर

रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या ग्रंथपाल मीनल हळदणकर यांना राज्यस्तरीय ग्रंथमित्र पुरस्कार जाहीर

ग्रंथालय सेवक विभागीय पुरस्काराने होणार सन्मान; २५ हजार रुपये रोख पारितोषिक

रत्नागिरी :
महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन २०२४-२५ या वर्षासाठी डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) विभागस्तरीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई विभागातून रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या ग्रंथपाल श्रीमती मीनल मनोज हळदणकर यांची उत्कृष्ट ग्रंथालय सेवक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारासाठी त्यांना २५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे.

ग्रंथालय क्षेत्रात कार्यरत असलेल्या ग्रंथालय कर्मचारी आणि कार्यकर्त्यांच्या योगदानाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी हे पुरस्कार प्रदान केले जातात. ग्रंथालय चळवळीला प्रोत्साहन देणे, वाचनसंस्कृतीचा प्रसार करणे आणि ग्रंथालयांच्या माध्यमातून ज्ञानाचा प्रसार करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करणे हा या पुरस्कारांचा उद्देश आहे.
डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता (ग्रंथमित्र) विभागस्तरीय पुरस्कारासाठी अमरावती विभागातून श्री. सुनील एकनाथराव वायाळ, छत्रपती संभाजीनगर विभागातून श्री. गजानन पंडितराव शिंदे, नागपूर विभागातून श्री. मिलिंद धोंडबाजी जुनगडे, नाशिक विभागातून प्रा. डॉ. नरेंद्र बाबुराव गोसावी, पुणे विभागातून श्री. कैलास लक्ष्मण चोरे आणि मुंबई विभागातून श्री. चांगदेव भीमराव काळे यांची निवड करण्यात आली आहे. या प्रत्येक पुरस्कारार्थींना २५ हजार रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे.
तसेच डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय सेवक (ग्रंथमित्र) विभागस्तरीय पुरस्कारासाठी अमरावती विभागातून श्री. संजय वामनराव देशमुख, छत्रपती संभाजीनगर विभागातून श्रीमती गोकर्णा संजय सूर्यवंशी, नागपूर विभागातून श्री. सुनील सदाशिव बोरकर, नाशिक विभागातून श्री. रावसाहेब यादवराव वाळके आणि मुंबई विभागातून श्रीमती मीनल मनोज हळदणकर यांची निवड झाली आहे. या सर्व पुरस्कारार्थींना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.
रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या ग्रंथपाल मीनल हळदणकर यांची या पुरस्कारासाठी झालेली निवड ही जिल्ह्यातील ग्रंथालय क्षेत्रासाठी गौरवाची बाब मानली जात आहे. त्यांच्या या सन्मानामुळे ग्रंथालय क्षेत्रातील कार्यकर्ते आणि वाचनप्रेमींमध्ये आनंद व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here