रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचे सक्षमीकरण; १८ पोलीस ठाण्यांना आधुनिक साधनसामग्रीचे वितरण

0
6

 पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते साहित्य वितरण; सीसीटीव्ही यंत्रणा आणि पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठीही प्रयत्न

कणकवली / रत्नागिरी :
रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस दलाच्या कामकाजाला अधिक सक्षम करण्यासाठी १८ पोलीस ठाण्यांसह पोलीस अधीक्षक कार्यालयातील पारपत्र केंद्राला आवश्यक संगणक, फर्निचर आणि अन्य साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून ही खरेदी करण्यात आली असून, साहित्याचे वितरण पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने पोलीस दलाला आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. याच अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यात होमगार्ड भरती, शहरात सीसीटीव्ही यंत्रणा उभारणे तसेच पोलीस दल आणि श्वान पथकासाठी स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
पोलीस ठाण्यांमधील सुविधा सुधारणे, आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देणे आणि सुरक्षा व्यवस्थेचे आधुनिकीकरण करणे याला प्राधान्य असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here