राजिवड्यातील श्री स्वयंभू काशी विश्वेश्वर देवस्थानच्या नूतन भक्तनिवास व सभागृहाचे उद्घाटन

0
9

रत्नागिरी :
राजिवडा येथील श्री स्वयंभू काशी विश्वेश्वर देवस्थानच्या नूतन भक्तनिवास आणि सभागृहाचे उद्घाटन रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. कोकणातील अतिशय पुरातन, ऐतिहासिक आणि शिवभक्तांचे प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या या देवस्थानात झालेल्या सोहळ्याला स्थानिक नागरिक आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

यावेळी आमदार किरण (भैय्या) सामंत, देवस्थानचे अध्यक्ष मुन्नाशेठ सुर्वे, प्रसन्न अंबुलकर, राजन शेटये, जयसिंग (आबा) घोसाळे, शेखर घोसाळे, सोहेल मुकादम, अमित विलणकर, वर्षाताई ढेकणे, राजू कीर यांच्यासह देवस्थानचे विश्वस्त आणि मान्यवर उपस्थित होते.
देवस्थान परिसराच्या विकासात योगदान देण्याचे भाग्य लाभले, याचे मनस्वी समाधान वाटत असल्याची भावना पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली. रत्नागिरीतील प्राचीन देवस्थानांचा आध्यात्मिक वारसा जपत भाविकांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे आणि धार्मिक पर्यटनाला चालना देणे यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी रत्नागिरीच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरू शकणाऱ्या प्रस्तावित रोपवे प्रकल्पाच्या प्राथमिक पाहणीबाबतही त्यांनी माहिती दिली. या प्रकल्पामुळे पर्यटनवाढीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या सोहळ्याप्रसंगी देवस्थानचे विश्वस्त आणि भाविकांनी केलेल्या आपुलकीच्या स्वागताबद्दल उदय सामंत यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here