राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनात आश्रमशाळांची चमकदार कामगिरी.

0
47
राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनात आश्रमशाळांची चमकदार कामगिरी.
राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनात आश्रमशाळांची चमकदार कामगिरी.

राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनात आश्रमशाळांची चमकदार कामगिरी.

नागपूर येथे नुकतेच ५३ व्या राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांनी चमकदार कामगिरी केली आहे.

माध्यमिक गटात अनेर डॅम आश्रमशाळेच्या आर्यन केसराम पावरा या विद्यार्थ्याने ‘सेफ्टी इंडियन आर्मी’ हे उपकरण सादर केले होते. त्याची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली. सोनखांब (जि. नंदुरबार) अनुदानित आश्रमशाळेच्या आयुष गणेश गावित या विद्यार्थ्याच्या ‘आदिवासी बालकांचे सुरक्षा कवच’ प्रकल्पाला उच्च प्राथमिक गटात प्रथम क्रमांक तर माध्यमिक शिक्षक गटात मुलचेरा (जि. गडचिरोली) शासकीय माध्यमिक आश्रम शाळेचे शिक्षक राजेंद्रकुमार गणपुरपु यांच्या ‘लर्निग सायन्स विथ फन’ प्रकल्पाला द्वितीय क्रमांक मिळाला. भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरही हे विद्यार्थी आपली छाप उमटवतील, असा विश्वास शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here