राज्यातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी दिल्लीत केंद्रीय-राज्य सरकारच्या मंत्र्यांची बैठक

0
29
राज्यातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी दिल्लीत केंद्रीय-राज्य सरकारच्या मंत्र्यांची बैठक
राज्यातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी दिल्लीत केंद्रीय-राज्य सरकारच्या मंत्र्यांची बैठक

राज्यातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी दिल्लीत केंद्रीय-राज्य सरकारच्या मंत्र्यांची बैठक

मुंबई l प्रतिनिधी

राज्यातील आरोग्यसेवा अधिक सक्षम आणि गतिमान करण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा व राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्ली येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली.

या बैठकीत राज्यातील राष्ट्रीय आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी, सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधांचे बळकटीकरण, तसेच रुग्णकेंद्रित सेवा देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीदरम्यान नागरिकांना दर्जेदार व परवडणाऱ्या दरात औषधे उपलब्ध व्हावीत यासाठी प्रत्येक जिल्हा रुग्णालयात जनऔषधी केंद्र आणि अमृत फार्मसींचे जाळे राज्यभर वाढवण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्यमंत्री यांनी दिल्या. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा औषधांवरील खर्चाचा ताण कमी होईल.

क्षयरोग निर्मूलनासाठी जिल्हा व तालुका स्तरावर मिशन मोडमध्ये विशेष रणनीती राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तपासणी मोहीम विस्तृत करणे, उपचार सातत्याने चालवणे, रुग्णांना पोषण सहाय्य देणे आणि निक्षय मित्रांमार्फत फूड बास्केट देण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच राज्यातील क्षयरोग रुग्णांची एक्स-रे तपासणी वाढवण्यासाठी केंद्र शासनाकडून 96 अतिरिक्त हॅन्ड-हेल्ड एक्स-रे मशीन महाराष्ट्राला मिळणार आहेत.

केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयातून लोकाभिमुख, सक्षम आणि विश्वासार्ह आरोग्य व्यवस्था उभारण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला गेला. या बैठकीत आरोग्य सचिव ई. रवींद्रन आणि संचालक डॉक्टर नितीन अंबाडेकर यांचेसह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची क्षमता वाढवण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here