राज्यातील 74 पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पदक जाहीर

0
122
फोंडा घाटातील ‘अपघात’ प्रकरणाचा पाच वर्षांनी उलगडा; पैशाच्या वादातून खून, चार आरोपी ताब्यात
फोंडा घाटातील ‘अपघात’ प्रकरणाचा पाच वर्षांनी उलगडा; पैशाच्या वादातून खून, चार आरोपी ताब्यात

पोलिस सेवेतील योगदानासाठी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पोलिस पदकांची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील एकूण 74 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यामधील चार पोलिस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक, 25 पोलिसांना शौर्य पदक आणि प्रशंसनीय सेवेकरीता 45 पोलिस पदक जाहीर करण्यात आली आहेत.

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या प्रशंसनीय सेवेकरता आणि शौर्यासाठी पोलिस पदक जाहीर करतात. केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केलेल्या शौर्य पदक श्रेणीमध्ये 630 आणि सेवा पदक श्रेणींमध्ये 750 असे एकूण 1,380 पोलिस पदकं जाहीर केली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला एकूण 74 पदकं मिळाली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here