मुबंई- राज्यात लवकरच 7 हजार 231 पदांची पोलीस भरती केली जाणार आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली आहे. यासंबंधीचे आदेश पोलीस महासंचालकांना दिले आहेत, असेही ते म्हणाले. लवकरच यासंबंधीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. दरम्यान मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.


