राज्य कबड्डी खेळाडू आयोग स्थापनेची प्रक्रिया सुरू; माजी आंतरराष्ट्रीय खेळाडूंना आवाहन

0
13
राज्य कबड्डी संघटनेतर्फे खेळाडू आयोग
राज्य कबड्डी संघटनेतर्फे खेळाडू आयोग

राज्य कबड्डी खेळाडू आयोग स्थापनेची प्रक्रिया सुरू; माजी आंतरराष्ट्रीय खेळाडूंना आवाहन

मुंबई

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने राज्य कबड्डी खेळाडू आयोग (Players Commission) स्थापनेची प्रक्रिया सुरू केली असून, राज्यातील माजी आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडूंना या आयोगामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
असोसिएशनच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, खेळाडू आयोगाची स्थापना करण्यामागील उद्देश म्हणजे खेळाडूंचे हितसंबंध जपणे, त्यांच्या सहभागातून संघटनेच्या प्रशासनात पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि सुशासन अधिक प्रभावी करणे हा आहे.
आयोगाच्या स्थापनेनंतर खेळाडूंना संघटनेच्या प्रशासकीय निर्णय प्रक्रियेत प्रतिनिधित्व मिळणार असून, खेळाच्या विकासासाठी त्यांच्या अनुभवाचा उपयोग केला जाणार आहे. ही प्रक्रिया अमेच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया (AKFI) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि राष्ट्रीय क्रीडा प्रशासन अधिनियम २०२५ मधील तरतुदींनुसार राबविण्यात येत आहे.
या आयोगासाठी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेले माजी आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू, तसेच अर्जुन पुरस्कार, राज्य किंवा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त खेळाडू अर्ज करू शकतात. अर्जदाराचे वय २५ ते ७० वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनशी संलग्न जिल्हा संघटनांतील पात्र माजी आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी १० ऑगस्ट २०२६ पर्यंत विहित नमुन्यात अर्ज करून आवश्यक कागदपत्रांसह संघटनेच्या अधिकृत ई-मेलवर पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
निवड झालेल्या खेळाडूंना महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विशेष सदस्य म्हणून सहभागी होण्याचा अधिकार मिळणार आहे. या उपक्रमामुळे राज्यातील कबड्डी प्रशासनात खेळाडूंचा सक्रिय सहभाग वाढून खेळाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here