कुडाळ – स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयातील बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर कृ. सी.देसाई शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. बाळासाहेब पंतवालावलकर, सचिव श्री. गणेश कुशे महाविद्यालय प्राचार्या डॉ. उज्ज्वला सामंत आणि रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक प्रा.हसन खान उपस्थित होते.यावेळी उत्तम निकालाची परंपरा कायम ठेवून या वर्षी महाविद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला असून वाणिज्य शाखेतून प्रथम क्रमांक कु. राहुल राजकुमार वालावलकर, द्वितीय क्रमांक कुमा.निकिता रामणारायन शर्मा, तृतीय क्रमांक दिव्या विजय निकम तर कला शाखेतून प्रथम क्रमांक कुमा. पौर्णिमा प्रकाश गावडे, द्वितीय क्रमांक कु. सर्वेश यशवंत कुबल आणि कु. लोपेश अरुण परब ,तृतीय क्रमांक कु.बिरु बाळसो खरात यांना महाविद्यालया तर्फे भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी श्री. पंतवालावरकर यांनी आपल्या यशामध्ये महाविद्यालय व शिक्षक यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. आपण याची जाण ठेऊन महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी आपल्या परीने योगदान द्यावे. इथून मिळालेल्या ज्ञानातून सर्वांगीण विकास करून स्वतःची प्रगती साधावी.यावेळी श्री. कुशे यांनी बालवाडी पासून ते महाविद्यालयीन शिक्षण या संस्थेतून दिले जाते


