रामराजे महाविद्यालयात क्रांती दिनी देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा उत्साहात संपन्न

0
11
रामराजे महाविद्यालयात क्रांती दिनी देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा उत्साहात संपन्न
रामराजे महाविद्यालयात क्रांती दिनी देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा उत्साहात संपन्न

रामराजे महाविद्यालयात क्रांती दिनी देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा उत्साहात संपन्न

दापोली प्रतिनिधी : अरविंद मांडवकर
डिस्टिंक्टीव्ह एज्युकेशन सोसायटीच्या रामराजे ज्यु.कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स दापोली मध्ये आज ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिन प्राचार्य सौ.वेदिका राणे यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने महाविद्यालयात देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन विविध देशभक्तीपर गीते सादर करत उपस्थितांची मने जिंकली. या स्पर्धेमध्ये अकरावी सायन्सने प्रथम क्रमांक पटकावला.तर बारावी कला व वाणिज्य वर्गाला द्वितीय क्रमांक विभागून देण्यात आला.
याप्रसंगी रामराजे ज्यु. कॉलेजच्या प्राचार्या वेदिका राणे उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाल्या आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य सहज मिळाले नाही. त्यामुळे त्या स्वातंत्र्याचे मोल ओळखून ते टिकवून ठेवणे ही आपल्या सर्वांची विशेषत: युवा पिढीची जबाबदारी आहे. आजच्या विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासा पुरते मर्यादित न राहता आपल्या कर्तुत्वाने आणि निष्ठेने देशाच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान दिले पाहिजे. या कार्यक्रमासाठी प्रा.क्षितिजा गोडबोल, प्रा.रुपेश तांबे, प्रा.रसिका ओक, प्रा.प्रीती सकपाळ, प्रा. विश्वास नाईकवडी व ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते. या स्पर्धेचे परीक्षण प्रा.संतोष येसावरे व प्रा. रेश्मा तांबे यांनी केले. तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्मिता बैकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here