रायगड जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीचा रत्नागिरी, सिंधुदुर्ग अभ्यास दौरा

0
17
रायगड जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीचा रत्नागिरी, सिंधुदुर्ग अभ्यास दौरा
रायगड जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीचा रत्नागिरी, सिंधुदुर्ग अभ्यास दौरा

रायगड जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीचा रत्नागिरी, सिंधुदुर्ग अभ्यास दौरा

रायगड जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीचा तीन दिवसीय अभ्यास दौरा २५ ते २७ जूनदरम्यान रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात यशस्वीरित्या पार पडला.

या दौ-यादरम्यान समितीच्या सदस्यांनी अंगणवाड्या, ग्रामपंचायती, प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच विविध शासकीय संस्थांना भेटी देऊन महिला व बालविकास, आरोग्य आणि ग्रामविकास क्षेत्रातील नावीन्यपूर्ण उपक्रमांची पाहणी केली.
दौ-यात रत्नागिरी जिल्ह्यातील नाचणे ग्रामपंचायत येथे राबविण्यात येणा-या विविध विकासात्मक उपक्रमांना भेट देण्यात आली. ग्रामपंचायतीच्या लोकसहभागातून राबविण्यात येणा-या स्वच्छता, महिला सक्षमीकरण, बालविकास आणि ग्रामविकासाच्या विविध उपक्रमांची माहिती समितीने घेतली व त्यांचे कौतुक केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भेटीदरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती तसेच समितीचे इतर सदस्य उपस्थित होते.
दोन्ही जिल्ह्यांतील महिला व बालकल्याण विभागाच्या कामकाजाबाबत अनुभवांची देवाणघेवाण करण्यात आली. विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांचा अभ्यास करून ते रायगड जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
या अभ्यास दौ-यामुळे महिला व बालकल्याण, आरोग्य सेवा आणि ग्रामविकास क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यपद्धतींचा अभ्यास करून त्या रायगड जिल्ह्यात राबविण्यास निश्चितच मदत होणार असल्याचा विश्वास समिती सदस्यांनी व्यक्त केला.
अभ्यास दौ-यात महिला बालकल्याण सभापती रसिका केणी, समिती सदस्या मानसी दळवी, सुवर्णा ठाकरे, स्मिता पाटील, विजया पाशिलकर, उर्वशी वाडकर, वर्षा दोरे, मनाली काळींजकर व समिती सचिव तथा जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला बालविकास निर्मला कुचिक यांनी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here