रायगड जिल्ह्यातील पर्यटन विकासकामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करा – मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश

0
52
रायगड जिल्ह्यातील पर्यटन विकासकामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करा - मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश
रायगड जिल्ह्यातील पर्यटन विकासकामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करा - मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश

रायगड जिल्ह्यातील पर्यटन विकासकामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करा – मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश

मुंबई, दि. ३ : महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मंत्रालयातील त्यांच्या दालनात रायगड जिल्ह्यातील पर्यटनविषयक विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. जिल्ह्यातील पर्यटनाला अधिक चालना मिळावी तसेच समुद्रकिनाऱ्यांचा शाश्वत विकास व्हावा, यासाठी सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीत मौजे आरावी (ता. श्रीवर्धन) येथील बीच सुशोभीकरण तसेच श्रीवर्धन बीचला ब्ल्यू फ्लॅग मानांकन मिळविण्यासाठी सुरू असलेल्या विकासकामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.
यावेळी मंत्री आदिती तटकरे यांनी संबंधित यंत्रणांना सर्व विकासकामे दर्जेदार, निर्धारित कालमर्यादेत आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच पर्यटकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा, स्वच्छता, सुरक्षितता आणि पर्यटनासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यावर विशेष भर देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांचा पर्यटन विकास करताना पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देत शाश्वत पर्यटनाला चालना देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here