रायगड जिल्ह्यात उष्ण-दमट हवामानाचा अंदाज; २४ एप्रिलला मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

0
10

रायगड : प्रतिनिधी
दि. २३ ते २७ एप्रिल २०२६ या कालावधीत रायगड जिल्ह्यात प्रामुख्याने उष्ण व दमट हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. काही दिवसांमध्ये मेघगर्जनेसह पावसाच्या सरींची शक्यता असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

२३ एप्रिल रोजी दुपारनंतर किंवा संध्याकाळी हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. २४ एप्रिल रोजी मेघगर्जना, विजांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. २५ एप्रिलला हवामान उष्ण व दमट राहणार असून हलक्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दरम्यान, २६ व २७ एप्रिल रोजी हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे. वादळी वारे आणि विजांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here