रायगड जिल्ह्यात पुढील पाच दिवस हलका ते मध्यम पावसाचा अंदाज

0
14
रायगड जिल्ह्यात पुढील पाच दिवस हलका ते मध्यम पावसाचा अंदाज
रायगड जिल्ह्यात पुढील पाच दिवस हलका ते मध्यम पावसाचा अंदाज
रायगड जिल्ह्यात पुढील पाच दिवस हलका ते मध्यम पावसाचा अंदाज

मेघगर्जना आणि वादळी वाऱ्याची शक्यता

अलिबाग, दि. २८ : भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार रायगड जिल्ह्यात पुढील पाच दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागांत मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात काही ठिकाणी वीजांचा कडकडाट, वादळी वारे आणि अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी पडू शकतात. त्यामुळे नागरिकांनी तसेच शेतकरी आणि मच्छीमारांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
मेघगर्जनेच्या वेळी उघड्यावर थांबणे टाळावे, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा तसेच वीज पडण्याची शक्यता असताना झाडाखाली उभे राहणे किंवा जलाशयांच्या परिसरात जाणे टाळावे, असा सल्लाही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
हवामानातील बदल लक्षात घेता नागरिकांनी भारतीय हवामान विभागाच्या अधिकृत सूचना आणि स्थानिक प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here