रायगड पोलिसांकडून ‘आनंदाची दिवाळी, आपुलकीचा फराळ’ उपक्रम; दीपावली फराळाचे वाटप

0
13

रायगड :
स्नेह, सद्भावना आणि आनंदाची गोडी जपत रायगड पोलीस दलातर्फे दीपावलीनिमित्त फराळ वाटपाचा स्नेहपूर्ण उपक्रम आयोजित करण्यात आला. रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आँचल दयाल यांच्या उपस्थितीत हा उपक्रम उत्साहात पार पडला.
रायगड पोलिसांकडून ‘आनंदाची दिवाळी, आपुलकीचा फराळ’ उपक्रम; दीपावली फराळाचे वाटप
दिवाळी हा आनंद, आपुलकी आणि एकमेकांशी नाती दृढ करण्याचा सण आहे. याच भावनेतून रायगड पोलीस दलाने दीपावली फराळ वाटपाच्या माध्यमातून स्नेह आणि सद्भावनेचा संदेश दिला. या उपक्रमामुळे दिवाळीच्या आनंदात आपुलकीची गोडी अधिकच वाढली.
‘आनंदाची दिवाळी, आपुलकीचा फराळ’ या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. रायगड पोलीस दलाने सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देत, पोलीस दल सदैव जनतेच्या सेवेसाठी तत्पर असल्याचा संदेश दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here