रायगड पोलिसांचे विजय बाविस्कर फायरिंग प्रशिक्षणात अव्वल; तीन सुवर्ण आणि एका कांस्यपदकाची कमाई

0
15

रायगड :
रायगड जिल्हा पोलीस दलासाठी अभिमानास्पद कामगिरी करत राखीव पोलीस निरीक्षक (रापोनि) श्री. विजय बाविस्कर यांनी फायरिंग प्रशिक्षण स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. पुणे येथील SRPF ग्रुप १ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या Firing TOT प्रशिक्षणामध्ये त्यांनी SLR आणि Glock Pistol या दोन्ही प्रकारांत ‘Best Shooter’ तसेच ‘Overall First’ हा बहुमान पटकावला.
रायगड पोलिसांचे विजय बाविस्कर फायरिंग प्रशिक्षणात अव्वल; तीन सुवर्ण आणि एका कांस्यपदकाची कमाई
रायगड पोलिसांचे विजय बाविस्कर फायरिंग प्रशिक्षणात अव्वल; तीन सुवर्ण आणि एका कांस्यपदकाची कमाई
या उत्कृष्ट कामगिरीबद्दल विजय बाविस्कर यांना एकूण तीन सुवर्णपदके आणि एका कांस्यपदकाने गौरविण्यात आले. त्यांच्या अचूक नेमबाजी कौशल्याची आणि प्रशिक्षणातील उत्कृष्ट कामगिरीची या यशातून प्रचिती आली आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल रायगड पोलीस दलासह विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here