रिक्षात विसरलेली १२ तोळे सोन्याचे दागिने असलेली पर्स वर्तकनगर पोलिसांनी शोधून केली परत

0
11

ठाणे
 रिक्षामध्ये चुकून विसरलेली सुमारे ₹१८ लाख किमतीची १२ तोळे सोन्याचे दागिने असलेली पर्स वर्तकनगर पोलिसांनी तातडीने तपास करून शोधून काढत संबंधित ज्येष्ठ महिलेला सुरक्षित परत केली.
तक्रार प्राप्त होताच वर्तकनगर पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी, रिक्षाचा माग काढणे आणि संबंधित माहितीची पडताळणी करत पोलिसांनी अल्पावधीतच पर्सचा शोध लावला.
त्यानंतर सर्व सोन्याचे दागिने सुरक्षित अवस्थेत ज्येष्ठ महिलेच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांच्या तत्परता, कार्यक्षमता आणि नागरिकांप्रती असलेल्या बांधिलकीबद्दल तक्रारदार महिलेने वर्तकनगर पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले.
या कारवाईमुळे हरवलेल्या मौल्यवान वस्तू शोधून नागरिकांना परत देण्याच्या बाबतीत वर्तकनगर पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या तत्परतेची आणि विश्वासार्हतेची प्रचिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here