रुपनगरात विजेचा खांब कोसळला; रस्ताच झाला बंद!

0
7
रुपनगरात विजेचा खांब कोसळला; रस्ताच झाला बंद!
रुपनगरात विजेचा खांब कोसळला; रस्ताच झाला बंद!

रुपनगरात विजेचा खांब कोसळला; रस्ताच झाला बंद!

अज्ञात वाहनाच्या धडकेत खांब तुटून रहदारीच्या मार्गावर आडवा; संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महावितरणने तातडीने कारवाई करण्याची मागणी

दापोली : प्रतिनिधी: अरविंद मांडवकर
दापोली एसटी स्टँडच्या मागील बाजूस असलेल्या रुपनगर परिसरात रहदारीच्या रस्त्यावर विजेचा खांब कोसळल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. अज्ञात वाहनाने धडक दिल्याने विजेचा खांब बुंध्यातून पूर्णपणे तुटला असून तो थेट रस्त्यावर आडवा पडला आहे.
रुपनगरात विजेचा खांब कोसळला; रस्ताच झाला बंद!
रुपनगरात विजेचा खांब कोसळला; रस्ताच झाला बंद!
खांब रस्त्याच्या मधोमध कोसळल्याने या मार्गावरील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. रुपनगरमधील हा रस्ता नागरिक तसेच वाहनचालकांच्या नियमित वर्दळीचा असल्याने अचानक कोसळलेल्या खांबामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
विशेषतः रात्रीच्या वेळी रस्त्यावर आडवा पडलेला खांब वाहनचालकांच्या लक्षात न आल्यास गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, कोसळलेला विजेचा खांब तातडीने हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करावा तसेच आवश्यक ती दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक रहिवासी आणि वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.
संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महावितरण प्रशासनाने या घटनेची तातडीने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here