रोणापाल येथील श्री देवी माऊलीचा ४ डीसेंबर रोजी जत्रोत्सव
बांदा
रोणापाल येथील श्री देवी माऊली देवीचा वार्षिक जत्रोत्सव गुरूवार दि. ०४ डीसेंबर रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी १० वाजता देवीची पूजाअर्चा ,अभिषेक आदी धार्मिक विधी करून नंतर गाऱ्हाणे घालण्यात येईल.त्यानंतर ओट्या भरणे, दर्शन, नवस करणे,नवस फेडणे आदी कार्यक्रम सुरू राहतील.
रात्री १२ वाजता श्री देवीचा पालखी प्रदक्षिणा सोहळा आरंभ होईल. त्यानंतर रात्रौ उशीरा आरोलकर दशावतार नाट्य मंडळ आरवली यांचा दणदणीत नाट्य प्रयोग सादर होईल. पहाटे गोपाळकाल्याने जत्रोत्सवाची सांगता होईल. या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन श्री देवी माऊली देवस्थान समिती रोणापाल च्या वतीने करण्यात आले आहे.


