रोहा तालुक्यातील बाहे येथे अडकलेल्या २२ पर्यटकांची सुखरूप सुटका
रोहा तालुक्यातील बाहे येथे अडकलेल्या २२ पर्यटकांची सुखरूप सुटका
रेस्क्यू पथकाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली
रोहा | प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील बाहे परिसरात अडकलेल्या २२ पर्यटकांची बचाव पथकाने यशस्वीपणे सुखरूप सुटका केली.
मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत पर्यटक अडकून पडले होते. माहिती मिळताच रेस्क्यू पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य हाती घेतले आणि सर्व २२ पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढले.
या घटनेमुळे मोठी दुर्घटना टळली असून, पावसाळ्यात धबधबे, नद्या आणि दुर्गम पर्यटनस्थळांना भेट देताना नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.