रोहा येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन
रोहा : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड–अलिबाग आणि एम.बी. मोरे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा दि. २६ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
हा रोजगार मेळावा एम.बी. मोरे फाउंडेशन कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, रोहा–कोलाड रोड, MIDC धाटाव, ता. रोहा येथे होणार आहे. या मेळाव्यात नामांकित कंपन्यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे भरती केली जाणार आहे.
या रोजगार मेळाव्यासाठी SSC, HSC, ITI, डिप्लोमा, इंजिनिअर तसेच इतर पदवीधारक उमेदवार पात्र आहेत. इच्छुक उमेदवारांनी rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर Pandit Dindayal Upadhyay Job Fair या नावाने ऑनलाईन नोंदणी व अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी 02141-222029 किंवा 9421613757 या क्रमांकांवर संपर्क साधावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आयोजकांनी कळविले आहे.


