लक्ष्मी नारायण विद्यालय बिबवणेचा दहावीचा निकाल ९७.७२ टक्के
कुडाळ : लक्ष्मी नारायण विद्यालय बिबवणे या विद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल ९७.७२ टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
यंदा शाळेतून ४४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. श्रेया हनुमंत साळुंके हिने ९३.२० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. वरदा विनायक जोशी हिने ९०.८० टक्के गुणांसह द्वितीय, तर अनुष्का सुरज कुडपकर हिने ८८.८० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला.
या यशाबद्दल संस्थाध्यक्ष राजाराम सावंत, उपाध्यक्ष आनंद गावडे, सचिव प्रकाश कुबल, खजिनदार भरत सामंत, सहसचिव विठ्ठल माळकर तसेच मुख्याध्यापक भास्कर पारधी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षक-पालक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.


