लग्नास नकार दिलेल्या व्यक्तीला अडकवण्यासाठी बॉम्ब धमकीचे ईमेल

0
33
लग्नास नकार दिलेल्या व्यक्तीला अडकवण्यासाठी बॉम्ब धमकीचे ईमेल
लग्नास नकार दिलेल्या व्यक्तीला अडकवण्यासाठी बॉम्ब धमकीचे ईमेल

लग्नास नकार दिलेल्या व्यक्तीला अडकवण्यासाठी बॉम्ब धमकीचे ईमेल

नवी दिल्ली :

चेन्नईतील एका महिला तंत्रज्ञावर विविध राज्यांमध्ये बॉम्बस्फोटाच्या धमकीचे ईमेल पाठवल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या अनेक एफआयआर एकत्रित (क्लब) करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी परवानगी दिली. लग्नाचा प्रस्ताव नाकारलेल्या व्यक्तीला फसवण्यासाठी हे ईमेल पाठविल्याचा आरोप तिच्यावर आहे.

न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. सुनावणीदरम्यान याचिका कर्त्यांच्या वतीने वरिष्ठ वकील देवदत्त कामत यांनी सांगितले की, आरोपी महिला चेन्नईतील २९ वर्षीय रोबोटिक्स अभियंता असून तिच्याविरुद्ध सध्या देशातील विविध राज्यांत एकूण २३ एफआयआर नोंद आहेत. त्यामध्ये गुजरात, कर्नाटक, तेलंगणा आणि तमिळनाडू यांसह अनेक राज्यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here