मुंबई- गानकोकिळा लता मंगेशकर यांचे मंगळवारी मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु असताना वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यांवर मुंबईतील शिवाजी पार्क येथे सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अनेक राजकीय नेत्यांची आणि सेलिब्रिटींची उपस्थिती होती.
परंतु यावरूनच आता राजकारणाला जोर येत आहे. धर्म आणि पुतळ्याचे राजकारणाला जोर धरला जात आहे.शाहरुख खान लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहताना त्यांच्यावर फुंकर घालताना दिसल्यानंतर काही लोकांनी शाहरुख खान थुंकला असे म्हणत त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात आहे. त्याला उत्तर देताना ‘शाहरुख खानला ट्रोल करण्यात येते आहे ते अत्यंत चुकीचे आहे. शाहरुख दुवा मागत होता. हा काय प्रकार आहे, हा नालायक आणि बेशरमपणा आहे. धर्म जात पंथ द्वेष यापलिकडे तुम्हाला काही सूचत नाही? तुम्ही देशाची वाट लावली आहे.’ अशा शब्दात संजय राऊतांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
तर शिवाजी पार्कमध्ये लता मंगेशकर यांचं स्मारक उभारावं अशी मागणी भाजप आमदार राम कदमांनी पत्र लिहून केली आहे.लता मंगेशकर यांचं स्मारक शिवाजी पार्कमध्ये ज्या ठिकाणी त्या पंचतत्त्वात विलीन झाल्या त्याच ठिकाणी उभारण्यात यावे अशी मागणी भाजप आमदार राम कदमांनी केली आहे. त्यांच्या स्मारकाबाबत देशाला विचार करावा लागेल, स्मारकाविषयी राजकारण करु नका असा टोलाही संजय राऊतांनी भाजपला लगावला आहे.


