राज्याच्या महाविकास आघाडी सरकारने शेतजमिनीचा सातबारा उतारा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.ज्या शहरांमध्ये सिटी सर्वे पूर्ण झाले आहेत. तसेच सातबारा उताराही सुरू आहे, त्या शहरात आता सातबारा बंद करुन प्रॉपर्टी कार्ड सुरू करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाकडून घेण्यात आला आहे.
प्रॉपर्टी कार्ड सुरू करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला असून, मोठ्या शहरांमध्ये शेतजमीनी शिल्लक राहिलेल्या नाहीत. त्यामुळे या भागातील सातबारा उतारा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आहे. सध्या सिटी सर्व्हे झालेल्या शहरांत सातबारा सुरू असून, अशा शहरात सातबारा बंद करुन तिथे फक्त प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अनेक शहरात लोकसंख्या वाढ होत असल्याने शहरीकरण वाढू लागले आहे. त्यामुळे शेतजमिनीची कमतरता भासत आहे. त्यामुळे सातबाऱ्याचे रुपांतर आता प्रॉपर्टी कार्डमध्ये करण्यात आला आहे. कर चुकवण्यासाठी आणि इतर लाभ मिळावेत यासाठी सातबारा वापरला जातो.तर फसवणुकीचे प्रकारही काही ठिकाणी उघड झाले आहेत. त्यामुळे भूमी अभिलेख विभागाकडून शहरात सातबारा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. नाशिक, सांगली, मिरज तसेच पुण्यातील हवेली तालुक्यापासून या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्यात येणार आहे. नंतर हा निर्णय संपूर्ण राज्यात देखील लागू करण्याची शक्यता आहे.


