लाल भेंडीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल

0
46
लाल भेंडीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल
लाल भेंडीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल

लाल भेंडीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल

दापोली l प्रतिनिधी

दापोली विद्यापीठाच्या वाकवली प्रक्षेत्रात लाल भेंडीसह विविध भाज्यांवर संशोधन सुरू असून, उत्पादन, गुणवत्ता आणि बाजारमूल्य या तिन्ही बाबतीत लाल भेंडी समाधानकारक ठरत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

लाल भेंड आकर्षक रंगाबरोबरच पोषणमूल्यांनी समृद्ध पीक भविष्यात महत्त्वाचे ठरू शकते, असा विश्वास डॉ. चाळासाहेव सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथील कृषितज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. पारंपरिक हिरव्या भेंडीला पर्याय म्हणून तालुक्यात लाल भेंडीच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे.

पुढील हंगामात सुधारित वाणांचे बियाणे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू आहे. मार्गदर्शन शिबिरे, प्रात्यक्षिके आणि तांत्रिक सल्ल्याद्वारे अधिकाधिक शेतकऱ्यांना या पिकाकडे वळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

विद्यापीठाच्या वाकवली प्रक्षेत्रात लाल भेंडीसह विविध भाज्यांवर संशोधन सुरू असून उत्पादन, गुणवत्ता आणि बाजारमूल्य या तिन्ही बाबतीत लाल भेंडी समाधानकारक ठरत असल्याचे निष्पन्न झाले आहे. पुढील हंगामात सुधारित वाणांचे बियाणे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू आहे. मार्गदर्शन शिबिरे, प्रात्यक्षिके आणि तांत्रिक सल्ल्याद्वारे अधिकाधिक शेतकऱ्यांना या पिकाकडे वळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

लाल भेंडीमध्ये अँटिऑक्सिडंटस्, लोह, फायबर आणि जीवनसत्त्व ‘सी’ मुबलक प्रमाणात असून ती रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास आणि तारुण्य टिकवून ठेवण्यास उपयुक्त ठरते. हिरव्या भेंडीच्या तुलनेत बाजारात अधिक दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे. शहरी बाजारपेठ, सुपरमार्केट तसेच हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायातही या भाजीला चांगली मागणी निर्माण होत असून लाल भेंडीमुळे शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे नवे दालन खुले होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here