
वंचित जिल्हाध्यक्ष तानाजी कांबळेंनी कुडाळ येथे डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला केले अभिवादन.!
9 डिसेंबर 2025 रोजी ठीक दुपारी 3 वा.होणार कुडाळ तालुक्याची महत्वपूर्ण बैठक
कुडाळ | प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडीचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष
समाजभूषण तानाजी कांबळे यांनी कुडाळ येथे भेट देऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी कुडाळ तालुक्याचे ज्येष्ठ नेते व्हि.डी.जाधव,बापू कुडाळकर,यांनी पुष्प गुच्छ देऊन जिल्हाध्यक्ष तानाजी कांबळे यांचे स्वागत व अभिनंदन केले.

हे पण वाचा फासकीत अडकलेला बिबट्या खारेपाटणमध्ये जेरबंद
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष माजी सरपंच नाना नेरूळकर,जिल्हा महासचिव उत्तम जाधव, भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष,शिक्षण तज्ञ विश्वनाथ कदम सर, शंकर अण्णा कदम, भारतीय बौद्ध महासभेचे कणकवली तालुका अध्यक्ष सुभाष जाधव, जिल्हा पर्यटन उपाध्यक्ष भीमराव तळवडेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कुडाळ येथील समाज मंदिर येथे झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत कुडाळ तालुक्याची पक्ष बांधणी, तालुका कार्यकारणी, आणि आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावेळी महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष समाजभूषण तानाजी कांबळे, शिक्षणतज्ञ विश्वनाथ कदम सर यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी दुपारी ठीक 3 वाजता बापू कुडाळकर यांचे निवासस्थानी वंचित बहुजन आघाडी कुडाळ तालुक्याची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय अँड.बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व बुलंद करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करण्यास इच्छुक असलेल्या वंचित, बहुजन,अल्पसंख्यांक घटक तसेच विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी,युवक, युवती, महिला आणि भारतीय बौध्द महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीला आवर्जुन उपस्थित रहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष नाना नेरुळकर, जिल्हा महासचिव उत्तम जाधव, कुडाळ तालुक्याचे ज्येष्ठ नेते व्ही.डी.जाधव, बापु कुडाळकर यांनी केले आहे.

