वन्यप्राण्याची शिकार केल्याप्रकरणी चौकुळ येथे दोघे ताब्यात

0
279
वन्यप्राण्याची शिकार केल्याप्रकरणी चौकुळ येथे दोघे ताब्यात
वन्यप्राण्याची शिकार केल्याप्रकरणी चौकुळ येथे दोघे ताब्यात

वन्यप्राण्याची शिकार केल्याप्रकरणी चौकुळ येथे दोघे ताब्यात

आंबोली

वन्यप्राण्याची शिकार केल्याप्रकरणी आंबोली वनविभागाच्या पथकाकडून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. यात काडतुसासह मृत पिसुरी जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई काल रात्री बारा वाजण्याच्या सुमारास चौकुळ-केगत रस्त्यावर करण्यात आली. तुषार विजय गुंजाळ (वय ३८, रा. कुपवडे वसोली ता. कुडाळ), परशुराम संजय राऊळ (वय २७, रा. देऊळवाडी-मळगाव ता. सावंतवाडी) अशी या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून मृत पिसुरीसह जुपिटर दुचाकी व चार काडतूसे आणि बेकायदा बंदूक जप्त करण्यात आली आहे. याबाबतची माहिती आंबोली वनविभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार प्रमिला शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कारवाई केली. त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here