वसईत ‘कोकणी बाजारपेठ’चे आयोजन; कोकणातील उद्योजकांना मिळणार हक्काचे व्यासपीठ

0
20
वसईत ‘कोकणी बाजारपेठ’चे आयोजन; कोकणातील उद्योजकांना मिळणार हक्काचे व्यासपीठ
वसईत ‘कोकणी बाजारपेठ’चे आयोजन; कोकणातील उद्योजकांना मिळणार हक्काचे व्यासपीठ

वसईत ‘कोकणी बाजारपेठ’चे आयोजन; कोकणातील उद्योजकांना मिळणार हक्काचे व्यासपीठ

वसई : कोकणातील उद्योजकांनी साकारलेली ‘कोकणी बाजारपेठ’ वसईमध्ये भरत असून वसई आणि पालघर परिसरातील नागरिकांसाठी खरेदीची खास पर्वणी ठरणार आहे. कोकणातील स्थानिक उद्योजकांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. २१, २२ आणि २३ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या बाजारपेठेत कोकणातील उद्योजकांनी तयार केलेले विविध प्रकारचे घरगुती पदार्थ, आकर्षक दागिने, सुंदर साड्या, कपडे, हस्तकला वस्तू, गिफ्टिंग साहित्य, नैसर्गिक उत्पादने तसेच विविध उपयुक्त वस्तू एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत.
कोकणातील छोट्या व स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या उत्पादनांना ग्राहकांपर्यंत थेट पोहोचता यावे, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या माध्यमातून कोकणातील महिला व युवा उद्योजकांनाही आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री करण्याची संधी मिळणार आहे.
वसई आणि पालघर परिसरातील नागरिकांनी आपल्या कुटुंबीयांसह तसेच मित्रपरिवारासोबत या बाजारपेठेला भेट देऊन कोकणातील उद्योजकांच्या उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे आणि खरेदीचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
बाजारपेठेचे ठिकाण : वर्तक हॉल, चिमाजी आप्पा मैदानाजवळ, वसई (पश्चिम)
तारीख : २१, २२ आणि २३ ऑगस्ट २०२६
वेळ : सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here