वसई-विरारमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ऑनलाइन परवानगीची सुविधा

0
14
वसई-विरारमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ऑनलाइन परवानगीची सुविधा
वसई-विरारमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ऑनलाइन परवानगीची सुविधा

वसई-विरारमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ऑनलाइन परवानगीची सुविधा

मंडप उभारणीसाठी परवानगी प्रक्रिया सुलभ; ऑनलाइन अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहन

वसई-विरार :
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी परवानगी घेण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. वसई विरार महानगरपालिकेतर्फे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना रितसर परवानगी घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडप उभारणी तसेच उत्सव आयोजनासाठी आवश्यक परवानग्या मिळविण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मंडळांनी mandap.onlinevvcmc.in या संकेतस्थळाला भेट देऊन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी. अर्ज भरताना आवश्यक ती माहिती अचूकपणे नमूद करून संबंधित आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करावीत.
ऑनलाइन परवानगी प्रक्रियेमुळे गणेशोत्सव मंडळांना कार्यालयीन फेऱ्या कमी करून घरबसल्या अर्ज करता येणार असून, परवानगी प्रक्रियेत सुलभता आणि पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे.
गणेशोत्सव मंडळांनी वेळेत ऑनलाइन अर्ज करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी आणि महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here