वाकोला मच्छी मार्केटमध्ये मासे कापण्यास बंदी
कोळी बांधवांमध्ये संताप
मुंबई : Vakola Fish Market येथे मासे कापण्यावर पालिकेकडून अचानक बंदी घालण्यात आल्याने मच्छी विक्रेत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या निर्णयामुळे स्थानिक कोळी बांधवांच्या उपजीविकेवर थेट परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
दशकानुदशके मासे विक्री आणि कापणीचा व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांनी हा निर्णय अन्यायकारक असल्याचे सांगत मार्केटमधील व्यवसाय ठप्प होण्याची भीती व्यक्त केली आहे.
पालिकेच्या निर्णयाविरोधात कोळी बांधवांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला असून, “बंदी मागे घेतली नाही तर रस्त्यावर उतरू,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
या निर्णयामुळे वाकोला परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासन आणि विक्रेत्यांमध्ये तोडगा काढण्यासाठी चर्चेची मागणी होत आहे.


