वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या केळी पिकांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून पाहणी

0
22

बारामती तालुक्यात शुक्रवारी (ता. ५) झालेल्या वादळी पावसामुळे काऱ्हाटी परिसरातील केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार  (Sunetra Ajit Pawar) यांनी नुकसानग्रस्त शेतशिवाराला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून पिकांच्या नुकसानीची सविस्तर माहिती घेतली. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
राज्य शासनामार्फत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here