‘विकसित महाराष्ट्रा’साठी शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नवी कौशल्ये आत्मसात करावीत : विकास खारगे

0
15

महसूल विभागाच्या ‘फ्रॉम फाईल्स टू फ्यूचर’ प्रशिक्षण सत्रात बदलत्या तंत्रज्ञानानुसार सक्षम होण्याचे आवाहन

मुंबई :
बदलत्या काळानुसार शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नवीन कौशल्ये आत्मसात करून स्वतःला भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज करावे. समन्वय, जबाबदारी आणि व्यापक दृष्टिकोनातून काम करून ‘विकसित महाराष्ट्रा’च्या उभारणीत योगदान द्यावे, असे आवाहन महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी केले.
महसूल विभागाच्या ‘फ्रॉम फाईल्स टू फ्यूचर’ प्रशिक्षण सत्रात बदलत्या तंत्रज्ञानानुसार सक्षम होण्याचे आवाहन
महसूल विभागाच्या ‘फ्रॉम फाईल्स टू फ्यूचर’ प्रशिक्षण सत्रात बदलत्या तंत्रज्ञानानुसार सक्षम होण्याचे आवाहन
महसूल विभागाच्या वतीने आयोजित ‘फ्रॉम फाईल्स टू फ्यूचर’ या प्रशिक्षण सत्रात ते बोलत होते. प्रशासकीय कामकाजात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून स्वतःहून जबाबदारी स्वीकारल्यास आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण विकसित होतात, असे त्यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांनी स्वतःची क्षमता ओळखून शासनाच्या निःशुल्क iGOT प्रशिक्षण व्यासपीठावरील विविध अभ्यासक्रमांचा लाभ घ्यावा. वाचन, श्रवण आणि दृक्‌माध्यमांच्या माध्यमातून सातत्याने नवीन गोष्टी शिकण्याची सवय जोपासावी, असे आवाहनही खारगे यांनी केले. प्रशासकीय कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यामुळे कामकाजाचा वेग, पारदर्शकता आणि सुरक्षितता वाढण्यास मदत होते, असे त्यांनी स्पष्ट केले.
नागरिकांप्रती संवेदनशीलता महत्त्वाची
महसूल विभाग हा शासनाचा कणा असून, नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन संवेदनशीलतेने काम करणे ही प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याची जबाबदारी आहे, असे खारगे यांनी नमूद केले. प्रशासकीय यंत्रणा अधिक कार्यक्षम बनविण्यासाठी विविध विभाग, संस्था आणि व्यक्तींशी समन्वय साधणे आवश्यक आहे. या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे सोडवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी योगदान द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
बदलत्या प्रशासकीय गरजांनुसार कौशल्यविकास, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि जबाबदारीची जाणीव या बाबींना प्राधान्य दिल्यास प्रशासन अधिक सक्षम होऊ शकते. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सातत्यपूर्ण अध्ययनातून स्वतःची कार्यक्षमता वाढवावी, असा संदेश या प्रशिक्षण सत्रातून देण्यात आला.
यावेळी महसूल मंत्र्यांचे खासगी सचिव प्रवीण महाजन, अपर मुख्य सचिवांचे विशेष कार्य अधिकारी शिवाजी पाटील, विभागाचे सहसचिव संपत सूर्यवंशी यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here