विजयदुर्ग परिसरातील उबाठा गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
विजयदुर्ग परिसरातील उबाठा गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
देवगड, प्रतिनिधी : विजयदुर्ग परिसरातील उबाठा गटाशी संबंधित अनेक पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्यात नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी त्यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी पंचायत समिती सदस्य विष्णू घाडी (Vishnu Ghadi), तालुकाप्रमुख जयेश नर (Jayesh Nar), पुरळ विभाग प्रमुख संदीप गायकवाड (Sandeep Gaikwad), संदीप ढवळकर (Sandeep Dhawalkar), मणचे गावचे सरपंच दीपक तोरस्कर (Deepak Toraskar, गिर्ये ग्रामपंचायत सदस्य विनोद गावकर (Vinod Gavkar) यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
प्रवेश सोहळ्यात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी नव्या कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करावे, असे आवाहन करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपची ताकद वाढत असून विविध भागांतून पक्षात प्रवेशाचे प्रमाण वाढत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
नवीन कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे विजयदुर्ग आणि देवगड परिसरातील भाजप संघटनेला आणखी बळ मिळणार असल्याची प्रतिक्रिया पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.