विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून स्पर्धा परीक्षेत यश मिळवावे : सत्यवान रेडकर यांचे प्रतिपादन

0
26
विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून स्पर्धा परीक्षेत यश मिळवावे : सत्यवान रेडकर यांचे प्रतिपादन
विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून स्पर्धा परीक्षेत यश मिळवावे : सत्यवान रेडकर यांचे प्रतिपादन

विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून स्पर्धा परीक्षेत यश मिळवावे : सत्यवान रेडकर यांचे प्रतिपादन

आचरा- विवेक परब
शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली कॉलेज, कणकवली स्पर्धा परीक्षा व मार्गदर्शन केंद्र, वाणिज्य विभाग, अंतर्गत गुणवत्ता व हमी कक्ष आणि स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने “स्पर्धा परीक्षांची तयारी” या विषयावर शनिवार दि. ०४ जुलै, २०२६ रोजी विशेष मार्गदर्शनाचे शिबीराचे आयोजन महाविद्यालयाच्या एचपीसीएल हॉलमध्ये करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी भारत सरकारच्या केंद्रीय वस्तू व सेवा कर विभाग, मुंबई येथील वरिष्ठ अनुवाद अधिकारी मा. श्री. सत्यवान यशवंत रेडकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. कोकण व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले श्री. रेडकर हे शासकीय तसेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ते सातत्याने कार्यरत असून त्यांनी विविध स्पर्धा परीक्षांचे स्वरूप, अभ्यास पद्धती, उत्तरलेखन कौशल्य, वेळेचे व्यवस्थापन तसेच यशस्वी होण्यासाठी आवश्यक मानसिक तयारी या विषयांवर अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. या मार्गदर्शन सत्रामध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी कशी करावी, अभ्यासाचे योग्य नियोजन कसे ठेवावे, उपलब्ध वेळेचा प्रभावी उपयोग कसा करावा तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी आवश्यक असलेली सकारात्मक दृष्टी आणि सातत्य याबाबत सविस्तर माहिती दिली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करावे, असे प्रतिपादन केले.
स्पर्धा परीक्षांद्वारे प्रशासकीय सेवेत प्रवेश करून देशसेवा करण्याची इच्छा बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी योग्य नियोजन, सातत्यपूर्ण अभ्यास, वेळेचे व्यवस्थापन आणि आत्मविश्वास यांच्या आधारे स्पर्धा परीक्षांची तयारी करणे आवश्यक आहे. याच उद्देशाने महाविद्यालयामार्फत या विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री. युवराज महालिंगे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मारोती चव्हाण यांनी केले. स्पर्धा परीक्षा व मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक डॉ. रामदास बोलके यांनी स्वागत व प्रास्ताविक व श्री. संदीप तेली यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला तसेच कार्यक्रमाचे आभार श्री. निलेश खुटाळे यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्टचे संदीप सावंत, डॉ.सोमनाथ कदम, महाविद्यालयातील प्राध्यापक व स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here