विद्यार्थ्यांसाठी योजनांची माहिती शाळांमध्ये दर्शनी लावा : दादाजी भुसे

0
50

मुंबई l प्रतिनिधी

विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या विविध योजना उपलब्ध असून त्यांची सविस्तर माहिती प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे अत्यंत आवश्यक आहे. कोणताही विद्यार्थी योजनांपासून वंचित राहू नये यासाठी ठोस प्रयत्न करण्यात यावेत, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. शालेय शिक्षण विभागाच्या विविध योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

प्रत्येक शाळेच्या दर्शनी भागात लावण्यात यावी, जेणेकरून विद्यार्थी व पालकांना त्याची सहज माहिती मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजने अंतर्गत अनाथ विद्यार्थी, दोन्ही पालक अपंग असलेले विद्यार्थी तसेच लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये पीडित विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दरमहा दोन हजार दोनशे पन्नास रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.

या योजनेचा लाभ पात्र विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी महिला व बालकल्याण विभागामार्फत नियुक्त संस्थांनी अशा बालकांचा शोध घेऊन त्यांची संपूर्ण माहिती सादर करावी, असेही त्यांनी सांगितले.

या योजनेसंदर्भात जिल्हा न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून कार्यवाही केली जाते. तसेच एकल पालक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी करोना कालावधीत सुरू करण्यात आलेली योजना आता नियमित स्वरूपात सुरू असून तिचाही लाभ गरजू विद्यार्थ्यांना मिळत असल्याचे मंत्री भुसे यांनी नमूद केले.

योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा स्तरावर नियमित आढावा घेण्याचे तसेच शाळांनी लाभार्थी विद्यार्थ्यांची नोंद ठेवावी. योजनांची माहिती पालकसभांमधूनही द्यावी. जेणेकरून पात्र विद्यार्थी कोणत्याही परिस्थितीत वंचित राहणार नाहीत, असेही मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले

प्रत्येक शाळेच्या दर्शनी भागात लावण्यात यावी, जेणेकरून विद्यार्थी व पालकांना त्याची सहज माहिती मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here